BREAKING… मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात

पुणे – सोलापूर महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्यात. कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून ट्रॅव्हल्सचेही मोठे नुकसान झाले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर गुरुवारी (ता. १७ ऑक्टोबर) पहाटे हा अपघात झाला. पुणे सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी येथे कार आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात जोरदार धडक होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे राजश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्यात. धडक इतकी जोरदार होती की मुंडेंच्या लँड क्रूझर कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Leave a Comment