विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये १३ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यामध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधून प्रतिभा पाचपुते, पुण्यातील पर्वती मतदारसंघामधून माधुरी मिसाळ, जिंतूर मतदारसंघामधून मेघना बोर्डीकर, भोकर मतदारसंघामधून श्रीजया अशोक चव्हाण, फुलंब्रीमधून अनुराधाताई अतुल चव्हाण, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे, चिखलीमधून श्वेता महाले, दहिसरमधून मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.
