मोठी बातमी! अखेर भाजपच्या “त्या” नेत्यावर मोठी कारवाई, जयश्री थोरातांबद्दल केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य

संगमनेर – धांदरफळ येथील माजी खासदार सुजय विखेंच्या सभेत जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देशमुख यांच्यावर पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जयश्री थोरात यांच्यासह कार्यकर्त्यांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता.

अशात वसंतराव देशमुख यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. पण घडलेल्या घटनेनंतर संगमनेर मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

धांदरफळ येथील सभा संपल्यानंतर थोरात समर्थक महिला जाब विचारण्यासाठी गेल्या असता त्यांना धक्काबुक्की केल्याचा पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला. घटनेनंतर तालुक्यातील निमोण गावात युवक आणि महिलांना मारहाण प्रकरणी विखे समर्थक सरपंच तसेच काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. निमोण गावात मारहाण झालेल्या मुलाला आणण्यासाठी गेलेल्या काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Comment