संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील धांदरफळ गावात भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे.
जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. वसंत देशमुख यांनी हे विधान केलं असून त्यावेळी सुजय विखे देखील मंचावर उपस्थित होते. यामुळे संगमनेर तालुक्यातील वातावरण पेटले आहे.
सदर घटनेवरुन महाविकास आघाडीबरोबरच महायुतीकडूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, काल संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. बाळासाहेब थोरात यांच्या कन्येविषयी ज्या पद्धतीने वसंतराव देशमुख नावाचे वृद्ध गृहस्थ बरळले ते संताप जनक आहे. भाऊ म्हणून आम्ही डॉ. जयश्री थोरात यांच्या पाठीशी खंबीर आहोत. राजकारण इतक्याही खालच्या पातळीवर जाऊ नये.
