बिग ब्रेकिंग! ठाकरे गटाच्या “या” उमेदवाराला मनसेचा पाठिंबा?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे (MNS) विद्यमान आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला मनसे विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होणार होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाने या जागेवर उमेदवार दिल्यामुळे आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे मनसेचे पदाधिकारी अंबरनाथमध्ये थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.

अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाने आमदार बालाजी किणीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही. मात्र शिवसेना शिंदे गटाने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्याने आता मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी यांनी अंबरनाथमधील एका कार्यक्रमात बोलताना राजेश वानखेडे हे माझे मित्र आहेत. त्यात अंबरनाथमध्ये मनसेचा उमेदवारही नाही. त्यामुळे मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, असे वक्तव्य केले. तर अंबरनाथचे ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Comment