हवामान अंदाज, राज्यातील १३ जिल्ह्यात दिला “हा” इशारा 

राज्यभरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. मागील दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज दिवाळी पाडव्याला राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, निम्म्या महाराष्ट्रात आज उघडीप असेल. तर १३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. शुक्रवारी सांगलीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अवकाळी पावसाचा शेतक-यांना सर्वांधिक फटका बसला आहे.

आज, शनिवार दि.२ नोव्हेंबर(दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा) रोजी निम्म्या महाराष्ट्रात उघडीप असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक पुणे, कोल्हापूर घाटमाथा, सातारा बीड धाराशिव नांदेड लातूर परभणी अश्या १३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित २३ जिल्ह्यात आज स्वच्छ वातावरण जाणवेल.

Leave a Comment