मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.
कन्या : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
तूळ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
धनू : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी आणि आशावादी राहील.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
