महायुतीला मोठा धक्का, बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

बीडमध्ये भाजपच्या माजी आमदाराने पक्ष बदल्याने केज विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. फक्त महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावरून नाराजीनाट्य पाहायला मिळाले. अशातच बीडमध्येही केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते.

पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर आता संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, एकीकडे पंकजा मुंडे यांनी नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली. त्यानंतर सलग दोनवेळा पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Leave a Comment