पुणे भारतीय जनता पक्षाला(BJP) तीन महिन्यांपासून धक्क्यांवर धक्के बसत आहे. पुणे शहर व जिल्ह्यात भाजप घराघरापर्यंत नेण्यात महत्वाचा वाटा असणारे तीन नेत्यांची निधन झाले आहे.
या तिन नेत्यांनी पुणे(Pune) जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देत भाजप रुजवले आणि पुणे शहर, पिंपरी चिंचवडमधून सत्ता मिळवली. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले.
त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत ३ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहिलेले लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले.
त्यानंतर आता पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
