संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहे. राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांनी झंझावाती सभा, दौरे करत राजकीय वातावरण ढवळून काढलं होतं. संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ जोरदार सभा, दौरे, गावोगावी प्रचार, संवाद यात्रा काढण्यात आल्या. प्रचाराला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साकूर गटात देखील बाळासाहेब थोरातांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे या देखील उपस्थित राहिल्या होत्या.
दरम्यान साकूर परिसरातील काही कार्यकर्त्यांनी आज सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलाय. सोपान खेमनर व महादेव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली जांभूळवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रविण दगडू खेमनर, अंकुश बाळू खेमनर, अशोक बाळू खेमनर, संदिप गोपीनाथ खेमनर, विशाल खेमनर, अमोल खेमनर, मयुर खेमनर या युवकांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
तसेच कॉंग्रेसच्या विचारांवर काम करून आम्ही बाळासाहेब थोरात यांच्या सोबत सक्रिय राहणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी देखील कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने साकूर गटात विरोधकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
