बिग ब्रेकिंग! आमदार अमोल खताळ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन, तातडीने मुंबईला रवाना 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या ४० वर्षांपासून संगमनेरचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब थोरातांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केलाय. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणाऱ्या अमोल खताळ यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट स्पेशल विमान पाठविले असून ते माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सोबत ते मुंबईला रवाना झाले आहेत. 

संगमनेरमध्ये नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच यावेळी सुजय विखे यांचा वाढदिवस सोहळा मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुजय विखे देखील उपस्थित होते. या दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना सुजय विखे यांनी ही माहिती दिली.

Leave a Comment