Petrol Diesel Price: महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता आणखी एक भर पडली आहे. आधीच गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती, सोन्याच्या किंमतीत वाढ, अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे वाढत्या दरामुळे सर्वसामान्य चिंतेत असतात आता पेट्रोल-डिझेल महाग (Petrol-diesel expensive) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सौदी अरेबिया आणि तेल उत्पादक (Saudi Arabia and oil producers) आणि निर्यातदार देशांच्या संघटनेनं तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केलीय. त्याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) भडकण्यावर होऊ शकतो.
जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किमतीत पुन्हा मोठी उसळी पाहायला सुरुवात झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे $85 पर्यंत वाढली आहे. तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला. आज यूपीसह अनेक राज्यांच्या शहरांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला आहे.
यामध्ये गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 36 पैशांनी महागून 97 रुपये, तर डिझेल 30 पैशांनी वाढून 89.62 रुपये प्रति लिटर झाले. गाझियाबादमध्ये पेट्रोल 32 पैशांनी महागले असून 96.58 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 30 पैशांनी वाढले आहे आणि 89.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महागले असून ते 96.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
तर गेल्या 24 तासांत त्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 84.57 पर्यंत वाढली आहे. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल $80.13 पर्यंत वाढला आहे.
