साकूर ब्रेकिंग! घराला आग लागून संसारउपयोगी वस्तू जळून खाक 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत बु येथील देवराम आप्पाजी मेंगाळ यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडलीय. या आगीत देवराम मेंगाळ यांच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झालाय. नेमकं आग का लागली? अद्याप कारण समोर आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, साकूर पठार भागातील जांबुत बु येथील वैतागवाडी या ठिकाणी देवराम आप्पाजी मेंगाळ सहकुटुंब राहत आहे. दररोज ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. मंगळवारी दुपारी कामानिमित्त देवराम मेंगाळ हे बाहेर गेले होते. घरी एक महिला व छोटं बाळ होतं. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक छपाराच्या घराला आग लागली.

आग लागल्याची माहिती समझताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या आगीत संपूर्ण घरातील संसारच जळून खाक झालाय. आग लावली तेव्हा घरात झोळीत छोटं बाळ झोपलेले होते. मात्र संतोष शेटे यांनी जीवाची पर्वा न करता त्यास बाहेर काढले. परंतु या आगीने देवराम आप्पाजी मेंगाळ यांच्यावर मोठं संकट कोसळलय.

Leave a Comment