संगमनेर – प्रवरा कारखान्याने आपल्या तालुक्यात गट ऑफिस सुरू केलं. आता यांचा पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थांवर देखील राहील. नवीन आमदार झाल्यानं त्यांना ही हिंमत झाली आहे. नवीन झालेला आमदार हे त्यांचे हत्यार आहे.
काही मंडळी मला म्हणत होती की तुम्ही तिकडे कशाला गेले. मात्र त्यांनी मंत्री (विखे पाटील) झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या. मग माझ्याकडे पर्याय नव्हता. मी हा अन्याय सहन करू शकत नाही.
त्यानंतर तिकडे गेलो आणि गणेश कारखाना ताब्यात घेतला. मी स्वतः यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहणार आहे. काही झालं तरी देखील मी उभा राहणार, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांना दिला.
निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातून बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
