मुंबई : लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा झाली नसती. लोकांच्या मनात काय ते तुम्हाला कळलेच नाही, परिणामत: बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८… म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव स्वीकारा, असे आवाहन विरोधकांना केले. काँग्रेसला ८० लाख मते मिळूनही १६ जागा कशा मिळाल्या, असा प्रश्न विरोधक करत आहेत. लोकसभेला आम्हाला ७३ लाख मते पडली; पण जागा ७च आल्या, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम नाही आठवले का, असा सवाल त्यांनी केला.
