मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : गुरुकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कन्या : वादविवाद टाळावेत. मनोबल कमी राहील.
तूळ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृश्चिक : हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
धनु : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मकर : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
