आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.

 

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

सिंह : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

 

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

धनू : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मकर : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

 

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील.

Leave a Comment