लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले हप्ता कधी जमा होणार?

राज्यातील जनतेने बिनधास्त रहावे, कारण जी आश्वासने आम्ही दिली आहेत. ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. त्यातील एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही.

विधानसभा निवडणुकीत जी योजना किंगमेकर ठरली ती लाडकी बहीण योजना कायम ठेवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना दिले. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.१९) चौथा दिवस आहे.

“मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचे आभार मानतो की त्यांनी महायुतीला घवघवीत यश देत निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एक है तो सेफ है या नाऱ्याला महाराष्ट्राने मोठा प्रतिसाद दिला. यातून मोठा विजय महाराष्ट्राला प्राप्त झाला. महायुती काळात सुरू झालेल्या सर्व योजना कायम राबविले जातील”, असे आश्वासनदेखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या लाडक्या बहिणींनी (Ladki Bahin Yojana) महायुतीवर प्रेम दाखवलं. त्यांच्यासाठी हे अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आम्ही पुढील हप्ता जमा करणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

Leave a Comment