संगमनेर(DSNews24) तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा 15 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे मावळते अध्यक्ष चंद्रकांत महाले यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये मागील वर्षी संघटनेने घेतलेल्या कार्यक्रमांवर चर्चा झाली व पुढील वर्षात घेण्यात येणारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सन २०२५ करिता नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष शकीलभाई शेख व पंचमंडळ यांनी अध्यक्ष म्हणून सुशांत सातपुते, कार्याध्यक्ष संजय अहिरे, उपाध्यक्ष दत्तात्रय घोलप,रामा लोखंडे आणि ओंकार सस्कर,सचिव संदीप सातपुते,सहसचिव हुसेन पटेल, खजिनदार राजु शेख, जिजाबा हासे यांची निवड करण्यात आली असून प्रसिद्ध प्रमुख चंद्रकांत महाले, सलीम शेख, सल्लागार यादवराव पावसे, किशोर कालडा, राजेंद्र थेटे, किशोर डोंगरे,रत्नाकर सातपुते,योगेश रातडीया, वसंत बदावने, रामा लोखंडे, तर कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड संग्राम जोंधळे यांची निवड करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या पत्रकार संघाने आजपर्यंत विविध उपक्रम राबवले असून सामाजिक एकोपा, रक्तदान शिबिर,दंत तपासणी शिबिर,आरोग्य विषयक मोफत शिबिर ,रस्ते सुरक्षा अभियान,एक गावी एक गणपती असे समाजहिताचे कार्यक्रम अनेक वेळा घेतले आहेत, यापुढेही ही कामे पत्रकार संघाच्या वतीने सुरूच राहतील असे आश्वासन नूतन पदाधिकाऱ्यांनी दिले.
या प्रसंगी संघटनेचे सदस्य दिनेश बांगर, रामचंद्र कपिले, सचिन भागवत, हरिभाऊ मंडलिक,आनंद समुद्र उपस्थित होते.
