हेलिकॉप्टरमधून होणार साकूरच्या बिरोबारायांसह “या” तिर्थक्षेत्रावर पुष्पवृष्टी 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) श्री.संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमनास ३७५ वर्षपूर्ती होत असून या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावात संगमनेर,अकोले,पारनेर पठार भाग तर जुन्नर तालुक्यातील काही गावांच्या सहभागातून अशा १०० गावांच्या सहकार्याने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा दि २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजीत करण्यात आला आहे. या सप्ताहाची जय्यत तय्यारी जोरदार सुरू झाली आहे.

जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज वैकुंठगमन ३७५ वर्षपुर्ती म्हणजेच त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा निमित्त जगतगुरु श्री.संत तुकोबारायांच्या पावन पवित्र पादुकांचे सरपंच जालिंदर गागरे यांचे वतीने पुण्यभुमी श्री.क्षेत्र देहु ते श्री.क्षेत्र बोटा या पावनभुमीत हेलिकॉप्टर द्वारे रविवार दि.२२ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता श्री.क्षेत्र देहु गावावरुन प्रस्थान होणार आहे. पठार भागातील ३६ स्वयंभु तिर्थक्षेत्रांवर आकाशातुन पुष्पवृष्टी करत करत बरोबर ४:०० वाजता बोटा गावातील सप्ताह ठिकाणी हेलिकॉप्टर उतरणार आहे.

तुकोबारायांच्या विमानाचे आगमन आज दुपारी १:३० वा‌ रेडासमाधी आळे याठिकाणी होईल आणि पुढील वेळापत्रक असे राहील….

(या तीर्थक्षेत्रावर पुष्पवृष्टी होणार.)

✓१. आईकळमजाईमाता मोरदरा दु.१:४० वा.

✓२. मळगंगामाता म्हसवंडी दु: १:४५ वा.

✓३. श्रीरोकडेश्वर आंबीदुमाला दु. १:५० वा.

✓४. श्रीराम कुरकुटवाडी दु. १:५५ वा.

✓५. रामदासबाबा बेलापुर दु. २:०० वा.

✓६. भोजामाता भोजदरी दु. २:०५ वा.

✓७. खंडोबा वनकुटे दु. २:१० वा.

✓८. हनुमान कोठेखु. दु. २:१५ वा.

✓९. खंडोबा कोठेबु. दु. २:२० वा.

✓१०. हनुमान तांगडी दु. २:२५ वा.

✓११. सावताबाबा बोरबन दु.२:३० वा.

✓१२. काळभैरवनाथ माळेगाव २:३५ वा.

✓१३. गोपालकृष्ण सारोळे दु. २:४० वा.

✓१४. म्हसोबा वरुठीपठार दु. २.४५ वा.

✓१५. श्रीखंडोबा सावरगावघुले दु. २:५० वा.

✓१६. कळमजाईमाता महालवाडी दु. २:५५ वा.

✓१७. हनुमान जवळेबाळेश्वर दु. ३:०० वा.

✓१८. श्रीक्षेत्र बाळेश्वरशिखर दु.३:०५ वा‌

✓१९. महादेव पोखरी दु. ३:१० वा.

✓२०. कानिफनाथ तळेवाडी दु. ३:१५ वा.

✓२१. काळभैरवनाथ डोळासणे दु. ३:२० वा.

✓२२. बिरोबामहाराज साकुर दु. ३:२५ वा.

✓२३. भगवतीमाता नांदुर दु. ३:३० वा.

✓२४. खंद्रेश्व खंदरमाळवाडी दु. ३:४० वा.

✓२५. विठ्ठलमंदिर येठेवाडी दु.३:४५

✓२६. हनुमान आभाळवाडी ३:५० वा.

✓२७. भागाईमाता मुंजेवाडी ३:५५ वा.

✓२८. श्री दत्त अकलापुर ४:०० वा.

✓२९. महालक्ष्मी केळेवाडी ४:०५

✓३०. हनुमान आळेखिंड ४:१०

✓३१. श्रीकृष्ण मंदिर माळवाडी ४:१२

✓३२. शनैश्वर आंबीखालसा ४:१७

✓३३. महादेव घारगाव ४:२० वा

✓३४. बोलआई कुरकुंडी ४:२३ वा.

✓३५. मुक्ताईमाता बोटा ४:२५ वा.

✓३६. कचेश्वर बोटा ४:३० वा.

✓३७. हेलीपॅड ४:३० वा.

 

या सोहळ्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदयातील दिग्गज महात्मे व संतांचे वंशज यांचे कीर्तन आयोजित केली आहेत.या कार्यक्रमात अनुक्रमे कीर्तनकार व प्रवचनकार पुढील प्रमाणे दि.२३ रोजी संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी व अगस्ती देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र महाराज नवले, दि.२४ रोजी संतवीर बंडातात्या महाराज कराडकर व शिवनेरी भूषण राजाराम महाराज जाधव, दि.२५ रोजी गाथा मंदिर देहूचे अध्यक्ष पांडुरंग महाराज घुले व अगस्ती आश्रम आळंदिचे अध्यक्ष रामनाथ महाराज जाधव,दि.२६ रोजी युवा कीर्तनकार उमेश महाराज दशरथे व वेदांतचार्य दिगंबर महाराज नरवडे, दि.२७ रोजी संत नामदेव महाराज यांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास व सुरेशराज दादा राहेरकर दि.२८ रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम तथा छोटे माऊली व अगस्ती आश्रम आळंदीचे उपाध्यक्ष सुदाम महाराज कोकणे, दि.२९ रोजी संत तुकाराम महाराज यांचे वंशज कान्होबा महाराज देहूकर व द्वाराचार्य रामकृष्णदास लहवितकर यांचे तुका अकाशा एवढा या विषयावर प्रवचन होईल.दि.३०डिसेंबर रोजी चंद्रशेखर महाराज देगलुरकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी १० वाजता होईल.यानंतर पुरण पोळीचा गोड महाप्रसाद समस्त ग्रामस्थ बोटा तळपेवाडी माळवाडी आळेखिंड केळवाडी कुरकुटवाडी यांच्या वतीने आयोजित केला गेला आहे.

या सोहळ्यात ३ एकर क्षेत्रात भव्य दिव्य कीर्तन मंडप,तर दिग्गज कीर्तनकार येणार आहे. कीर्तनासाठी ३७५ टाळकरी १२ मृदुंगाचार्य असणार आहेत.३७५ तरुण देहू ते बोटा अशी दिव्य ज्योती आणणार आहेत.यावेळी आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर, कृषी प्रदर्शन विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले आहे.३ एकर क्षेत्रात भोजन मंडप असून दररोज आमटी भाकरीचा महाप्रसाद परिसरातील वेगवेगळ्या १५ गावांच्या वतीने होणार आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, गडकरी, टाळकरी, फडकरी, राजकीय, सामाजिक,केला, क्रीडा,साहित्यिक,आरोग्य क्षेत्रातील तर वारकरी संप्रदाय व सर्व पंथीय मान्यवरांची उपस्थितीत राहणार आहेत.

या त्रिशकोत्तर सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त संगमनेर अकोले तालुका वारकरी संप्रदाय, मुळा खोरे, पठार भाग, समस्त ग्रामस्थ बोटा, दत्तात्रय महाराज भोर व किशोर महाराज धुमाळ यांनी केले आहे.

Leave a Comment