बाळासाहेब थोरातांना मिळणार महाराष्ट्राची “ही” जबाबदारी 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला आहे. तसेच नागपूरमधील गटबाजी उफाळून आली असून अनेकांनी पटोले यांना प्रदेशाध्‍यक्ष पदावरून हटविण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे.

यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींकडून लवकरच प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रदेशाध्‍यक्ष पदासाठी विधानसभा निवडणूकीत पराभव स्‍वीकारावा लागलेल्‍या बाळासाहेब थोरात यांच्‍या नावाचा समर्थकांकडून दावा केला जाता आहे.

Leave a Comment