नगर – पुणे महामार्गावर अपघात ; युवक ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू(Death)झाल्याची घटना नगर-पुणे महामार्गावर पळवे फाटा येथे घडली आहे. मनोज रामचंद्र कुलकर्णी (वय 35) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

मनोज कुलकर्णी हे सुपा येथून पळवे येथे घरी जात होते. नगर-पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा चौक ते पळवे फाटा यादरम्यान भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

यात कुलकर्णी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलीस रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले.

कुलकर्णी यांना तत्काळ सुपा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. याप्रकरणी सुपा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment