बिग ब्रेकिंग! बीडमध्ये पुन्हा एका सरपंचाचे अपहरण, पायात बेडी, हात- पाय बांधून खोलीतच….

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप तीन आरोपी फरार आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता बीड जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आणखी एका सरपंचाचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे.

बीडमधील एका माजी सरपंच पायात कुलूप घातलेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर इंगळे माजी सरपंचाचे नाव आहे. ते केज तालुक्यातील कळंब अंबा येथील रहिवासी आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडून फंड देतो म्हणून केज मधून मुंबईला जायचे म्हणून गाडीत बसवले. पाटोदा येथे गेल्यानंतर तीन लाख रुपये काढून घेत एका खोलीत हात आणि पाय बांधून डाबून ठेवले. कशीतरी सुटका करून धावत पळून आलो.. अस पीडित सरपंचाने सांगितले.

सरपंचाच्या पायात कुलूप

या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या माजी सरपंचाच्या पायात कुलूप लावलेले दिसत आहे. तर हाताला बांधलेले वण दिसत आहेत. यामुळे खळबळ उडाली असून याचा पोलीस तपास घेत आहेत.

Leave a Comment