आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष – विरोध सहन करा. राग आवरा. परिस्थिती नेहमी बदलत असते. दोन दिवसांनी प्रश्न सुटेल.

वृषभ – एकीची किंमत काय असते हे माणसाला कळायला वेळ लागतो. घरभेदी घरात शिरतो तेव्हाच.

मिथुन – प्रश्नांचा विचार दोन्ही बाजूने करता येईल. तुमचे महत्त्व वाढेल. प्रतिष्ठा मिळेल.

कर्क – तुमच्याबद्दल झालेला गैरसमज दूर होऊ शकेल. प्रयत्नाने समस्या सोडवा. अहंकाराने नाही.

सिंह – धंद्यात शांत डोक्याने विचार करा. जमिनीसंबंधी कामे करून घ्या. थकबाकी मिळेल.

कन्या – मन स्थिर ठेवा. अनेकांचे विचार ऐकून घ्या. तुमच्यावर असलेला दबाव कमी होईल.

तूळ – नकळत एखादी चूक होऊ शकते. तुम्ही सावध रहा. तुमची समस्या तुम्ही सोडवा.

वृश्चिक – विरोधाचा सामना करता येईल. जवळच्या मोठ्या लोकांना समजून घ्या. कुणालाही कमी समजू नका.

धनु – कोर्टाच्या कामात यश मिळेल. प्रश्न सोडवा. मोठे लोक मदत करतील. तुम्ही ठाम रहा.

मकर – तुमच्यावर प्रेम करणारे लोक जवळ राहतील. तुमचे वर्चस्व राहील. सामाजिक कार्य चालू ठेवा.

कुंभ – रागाचा पारा वाढू देऊ नका. मुद्दाम तुमची कळ काढण्याचा प्रयत्न होईल. संयम बाळगा.

मीन – तुमच्या कामाला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल. मानप्रतिष्ठा मिळेल. तुमचा फायदा होईल.

Leave a Comment