मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृषभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मिथुन : गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंवर मात कराल.
तूळ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
वृश्चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनू : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
