थोरातांच्या घराशेजारील मैदानावर विखेंचा ‘मै हूॅं डॉन’ गाण्यावर डान्स 

विखे अन् थोरात यांच्यातील राजकीय वैर वेगळ्याच पातळीवर पोचलं आहे. विखे हे थोरात यांना डिवचण्याची कोणतीही संधी सोडत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हा राजकीय संघर्ष अधिकच वाढला आहे.

आता भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या घराशेजारील मैदानावर ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर डान्स केला. सुजय विखे यांचा यांचे हे टायमिंग अन् डान्स करण्यासाठी निवडलेल्या गाण्यावरून संगमनेरमध्ये चर्चा रंगली आहे.

काँग्रेस(Congress) नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थाना शेजारीच जाणता राजा मैदान आहे. या मैदानावरील एका कार्यक्रमानिमित्ताने सुजय विखे आणि आमदार अमो खताळ एकत्र आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक रॅम्प वॉक केला.

भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर ठेका धरला. विखे यांचा हा ठेका जणू काही थोरातांना खिजवण्याचा प्रयत्नच होता. बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्यासाठी सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघात अनेक सभा घेत, अमोल खताळ यांना ताकद दिली होती.

विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात शिवसेनेचे अमोल खताळ यांना ताकद देताना, विखे आणि थोरात यांचा संघर्ष उफाळला होता. संगमनेरमध्ये दंगल झाली होती. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते. या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का बसला होता.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुजय विखेंना यांना पराभवाला समोरं जावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांना निवडून आणण्यात बाळासाहेब थोरात यांनी किंगमेकरची भूमिका निभावली होती.

Leave a Comment