मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
तूळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.
धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मकर : हितशत्रूंचा त्रास संभवतो. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कुंभ : कला क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मीन : व्यवसायात वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
