मुळोखोरे पतसंस्थेच्या चेअरमनपदी विठुराज मैड, व्हा. चेअरमनपदी गोकूळ पेंडभाजे बिनविरोध 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील सहकार अग्रेसर असलेली मुळाखोरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विठुराज मैड व व्हा. चेअरमनपदी गोकूळ पेंडभाजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही संपूर्ण निवडणूक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली होती. मात्र चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची निवड बाकी होते. नुकतेच ही निवडही संगमनेर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली. यावेळी चेअरमनपदासाठी विठुराज मैड व व्हा चेअरमन पदासाठी गोकूळ पेंडभाजे यांचेच एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर गोरे यांनी ही निवडणूक बिनविरोध केल्याची घोषणा केली.

दरम्यान गेल्या २० वर्षांपासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली विठुराज मैड मुळा खोरे पतसंस्थेच्या चेअरमनपदी विराजमान आहे. पाचव्यांदा त्यांच्यावर चेअरमनपदाची जबाबदारी मिळाली आहे. तसेच मुळा खोरे पतसंस्थेचा कारभारही ते अचूकपणे करत आहे. त्यामुळेच या पतसंस्थेला विविध पुरस्कार मिळाले आहेत.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव हजारे तसेच नवनिर्वाचित संचालक जिजाराम सखाराम देवगिरे, विजयकुमार रामचंद्र फिरोदिया, प्रशांत अशोक शेलार, मुसा लालभाई शेख, अशोक चंदाराम कर्डिले, हौसाबाई बबन गाडेकर, कल्पना दीपक वखारिया, अनमोल शंकरराव खेमनर, सुरेश महादू सोनवणे उपस्थित होते.

Leave a Comment