बापरे! नगर जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याच्या परिसरात वीज कोसळली

नेवासा(Nevasa) तालुक्यातील शिंगणापूर रोडवरील मुळा सहकारी कारखाना(Mula Sugar Factory) परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुसा गोदामावर वीज पडल्याने आग लागली.आठ अग्निशामक बंब आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.

सायंकाळी पाच वाजता वीजेचा मोठा कडकडाट झाल्याने परिसरातील नागरिकांत मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली होती. थोड्याच वेळात धुराचे लोट कारखाना परिसरात दिसल्याने तेथे काही क्षणात बघ्यांची मोठी गर्दी झाली.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी शनैश्वर देवस्थान, राहुरी नगर परिषद, ज्ञानेश्वर कारखाना, अशोकनगर कारखाना येथील अग्निशामक बंब आले. तसेच गंगामाई कारखाना व पाथर्डी परिषदेसह काही अग्निशामक पथक येण्यासाठी रवाना झालेली होती.

या आगीने आसपासच्या पूर्ण भुस्याच्या गोदामाला पेट घेतला. रात्री सात वाजेपर्यंत वेगाने वारा असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडथळा आला. मुळा कारखान्याचे कर्मचार्‍यांसह अग्निशामक दलाचे पथक ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते.

Leave a Comment