सर्वात मोठी बातमी! नगर जिल्ह्यातील “या” आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात…..

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विठे घाटात हा अपघात झाला आहे.

अकोले येथून राजूरकडे जाताना ट्रकची आणि कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे थोडक्यात बचावले.

आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानंतर लहामटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर आमदार लहामटे राजूर येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे थोडक्यात बचावले. कारण कारण आणि ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली होती. यामध्ये आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

Leave a Comment