मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यात अजुनही रविवार दि.२३ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता टिकून आहे.
रविवार दि.१६ एप्रिलपासुन संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित असलेली अवकाळी वातावरण निवळणीची शक्यता केवळ कोकणातील चार व विदर्भातील ११ अश्या एकूण १५ जिल्ह्यात केवळ दोन दिवसाकरिताच (दि.१६,१७) मर्यादित जाणवत आहे.
मंगळवार दि.१८ एप्रिलपासुन पुन्हा या ठिकाणी अवकाळी वातावरणाची शक्यता तशीच आहे. असा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
