मोठी बातमी! अजित पवारांना शिंदे गटात येण्याची ऑफर….

पुणे – मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.

यावर आता उपनेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना थेट शिंदे गटात येण्याची ऑफर दिली आहे. शिवतारे हे इंदापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवतारे म्हणाले की, “राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित दादा फक्त काम करणारा माणूस आहे, बाकी सगळी लुटारुंची टोळी आहे. अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत.

अजित पवार हे थोतांड माणूस नाहीत. कोणीतरी सांगितलं म्हणून गेले आणि परत आले यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. कारण तिकडे जे चाललं होतं ते ठीक नव्हते म्हणून ते तिकडे गेले.”

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, अजित पवार भाजपमध्ये गेल्यावर कोणाला आवडणार नाही, त्यांनी शिवसेनेत यावं असं म्हणत शिवतारेंनी थेट अजित पवारांना खुली ऑफरचं दिली. यावेळी शिवतारे यांनी अजित पवार पक्ष सोडायची मी वाट बघत असल्याचेही सांगितले.

Leave a Comment