शिवसेनेचा बुलंद आवाज हरपला ; वरवंडीचे कैलास पाटोळे यांचं निधन

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील वरवंडी येथील कैलास साहेबराव पाटोळे (वय ४५ ) यांचं रविवारी सायंकाळी ६.३० वाजता दुःखद निधन झाले आहे. कैलास पाटोळे यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती.

तसेच ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपळगाव देपा गणाचे गण प्रमुख होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पठारभागातील शिवसैनिकांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

लहानपणापासूनच कैलास पाटोळे यांनी शिवसेनेचे एकनिष्ठपणाने काम केले. तसेच पक्षाच संघटन वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. तसेच वरवंडी गावातील विकासकामातही मोलाच सहकार्य केले.

पठारभागात शिवसेनेची बुलंद तोफ तसेच एक आक्रमक नेता म्हणून ओळख होती. कोणत्याही कार्यात सतत आग्रही असायचे. परंतु कैलास पाटोळे यांच्या निधनाने पठारभागासह वरवंडी गावावर शोककळा पसरली आहे. वरवंडी येथील स्मशानभूमीत कैलास पाटोळे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कैलासरावांचं पठारभागातील शिवसेनेसाठी मोठं योगदान आहे. शिवसेनेचा धाडसी कार्यकर्ता म्हणून कैलासरावांना ओळखले जात होते. त्यांनी माझ्या सोबत पठारभागात शिवसेनेचे संघटन वाढविण्यासाठी मोलाच कार्य केले. त्यांचं अचानक निधन झाल्याची बातमी समजली पण खरं वाटतं नव्हते. शिवसेनेचा एक वाघ हरपला आहे.

जनार्दन आहेर
माजी जिल्हा परिषद सदस्य
शिवसेना नेते ( ठाकरे गट)

 

 

“कैलास पाटोळे कट्टर शिवसैनिक होते. शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले. शिवसेनेसाठी कैलासरावांनी जीवन वाहून घेतले होते. सच्चा शिवसैनिक हरपल्यामुळे पठारभागात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून निघणे अशक्य आहे.”

युवा नेते – गुलाबराजे भोसले

Leave a Comment