कौठेमलकापूर येथील “त्या” तरूणांच्या मृत्यूने निलम खताळ हळहळल्या, कुटुंबियांचे केले सांत्वन

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील कौठेमलकापूर येथील सुनिल पांडुरंग भूतांबरे व किरण पाराजी गावडे या दोन मित्रांचा दोन दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्याने पठार भागात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

नुकतेच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांनी भूतांबरे व गावडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन करत धीर दिला. दोन्ही तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने निलम खताळ यांनी हळहळ व्यक्त केली. तसेच त्यांनी कुटुंबीयांची परिस्थिती देखील जाणून घेतली. तसेच आपुलकीने मयत तरूणांच्या आई वडीलांची विचारपूस केली.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, खांबे गावचे सरपंच रविंद्र दातीर, गणेश डोंगरे, नवनाथ गंभीरे, सुरेश काळे, डॉ. वर्पे, अनिल आमले, बागुल आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment