साकूरमध्ये राजकीय खळबळ, उपसरपंच थोरातांच्या भेटीला, ZP ची निवडणूक लढविणार…..

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) राज्यात काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणूका ४ महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच या रखडलेल्या निवडणूका सप्टेंबर- ऑक्टोबर मध्ये पार पडणार असल्याची माहिती देखील समोर आलीय. या निवडणुकांबाबत तयारीची हालचाल राज्य निवडणूक आयोगाने केली असल्याची माहिती समोर आलीय. तसेच गट, गण व प्रभाग रचना कशी असणार किंवा आरक्षण कोणते निघणार या महत्त्वाच्या गोष्टी अजून स्पष्ट होणे बाकी आहे.

मात्र संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटात निवडणुकीची आतापासूनच तयारी इच्छुक उमेदवारांनी केल्याचं चित्र बघायला मिळत आहे. साकूर जिल्हा परिषद गटात 2017 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत महिला आरक्षण होते. मात्र त्यानंतर निवडणूक झाली नाही. मात्र आता आरक्षण कोणते निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आरक्षण निघण्याच्या अगोदरच जिल्हा परिषद सदस्यपदासाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र साकूर जिल्हा परिषद सदस्यपदासाठी जांबुत चे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून समोर आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सुभाष डोंगरे हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत जवळचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र सुभाष डोंगरे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते ऐनवेळी कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र सुभाष डोंगरे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन गुप्तगू चर्चा केल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात ऐनवेळी मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सुभाष डोंगरे यांनी काही महिन्यांपूर्वी पिंपळगाव खांडच्या पाण्यासंदर्भात आठ दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. तसेच जांबुत चे उपसरपंच पदावर असून विविध विकासकामांसाठी त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आंदोलन देखील केली आहे.

आता सर्वसामान्यांचे प्रश्न थेट जिल्हा परिषदेत मांडण्यासाठी त्यांनी ही निवडणूक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना पठार भागातून तसा प्रतिसादही मिळत आहे. परंतु साकूर गटात कॉंग्रेस व भाजपकडून बरेचशे उमेदवार चर्चेत आले आहे. मात्र यामध्ये सुभाष डोंगरे यांची दखल पक्षश्रेष्ठी घेतील का? किंवा ऐनवेळी अपक्ष उमेदवारी करणार अशीच चर्चा आता साकूर गटात सुरू झाली आहे.

Leave a Comment