मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
त्यानंतर अखेर आज (मंगळवारी) भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी वरळीत पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी निरीक्षक किरण रिजिजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.
