अहिल्यानगर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार्या जिल्ह्यांमध्ये मतदारांची संख्या मतदान केंद्राची संख्या, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आवश्यक मनुष्यबळ यासह ऐनवेळी उपस्थित राहणारे मुद्दे याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांकडून मागविण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने गुरुवार (दि 10) रोजी ऑनलाईन बैठक बोलावली आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत काढण्यात आलेल्या पत्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या जिल्ह्यात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची संख्या, 2024 नुसार विधानसभा मतदारांची संख्या व एक जुलै 2025 रोजी असणार्या मतदारांची संख्या, 2024 च्या विधानसभा निवडणुकीनुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रे, आगामी निवडणुकांसाठी प्रस्तावित असणारे मतदान केंद्र, निवडणुकीसाठी आवश्यक असणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, यात उपलब्ध कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मेमरी चिप्स यासह नादुरुस्त कंट्रोल युनिट, नादुरुस्त बॅलेट युनिट, निवडणुकांसाठी आवश्यक असणारे कंट्रोल युनिट यांच्या माहितीचा समावेश आहे.
तसेच या यंत्रांची प्राथमिक तपासणी झालेली दिनांक गोडाऊनचा तपशील यांचा देखील समावेश आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आवश्यक व प्रस्तावित करण्यात आलेले गोडाऊनची संख्या, निवडणूक काळातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देणारे मास्टर ट्रेनरची संख्या, निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा सविस्तर तपशील प्रपत्र नुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हाधिकार्यांकडून मागवलेला आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकार्यांनी तपशीलवार टिपणी सादर करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकी संदर्भात जिल्हाधिकार्यांकडून माहिती मागवली आहेत.
