मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह आणि उमेद वाढेल.
मिथुन : गुरूकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : मन आनंदी आणि आशावादी राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
धनू : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मीन : हितशत्रूंचा त्रास संभवतो. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
