आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये धक्का बसला आहे. पंजाबमधील खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार अनमोल गगन मान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनीही माहिती दिली.
पंजाब विधानसभा अध्यक्षांना अनमोल गगन मान यांनी राजीनामा पाठवला आहे. त्यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारल्यास पंजाबमध्ये आणखी एक पोटनिवडणूक होईल असे म्हटले जात आहे.
‘मी दु:खी मनाने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सभापतींना मी माझा राजीनामा पाठवला आहे, त्यांनी तो स्वीकारावा अशी माझी विनंती आहे. आम आदमी पक्षासोबत माझ्या शुभेच्छा नेहमी असतील. पंजाब सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी मला आशा आहे’, असे अनमोल गगन मान यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
