रऊफ शेख कुणाचाही आवाज दाबू शकत नाही, सचिन खेमनर यांचं जोरदार प्रत्युत्तर 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील साकूर पठारभागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मुळा नदीवर मोरवाडी येथे धरण व्हावे अशी जनतेची मागणी आहे. तसेच या भागातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मंत्रालयातील दालनात दीड महिन्यांपूर्वी विशेष बैठक पार पडली. मात्र त्यानंतर कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्याचं बघायला मिळाले. यामुळे मोरवाडी धरणाच्या विषयावरून चांगलेच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

त्यानंतर भाजपकडून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना जोरदार प्रत्युत्तर देखील देण्यात आल. भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य रऊफ शेख यांनी DSNews24 ला प्रतिक्रिया देताना मोरवाडी धरणासंदर्भात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये असा टोला लगावला होता. रऊफ शेख यांच्या त्या वक्तव्यावरून आता कॉंग्रेसचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष सचिन खेमनर यांनी एका मुलाखतीतून जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

सचिन खेमनर काय म्हणाले…..

रऊफ शेख हे आमचे मित्र आहे. वरीष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांना शांत व संयमी समजतो. पण त्यांनी एक वेगळीच मुलाखत दिली. मोरवाडी या विषयावर ते बोलले. रऊफ शेख यांचं म्हणणं आहे की, कॉंग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सल्ले देऊ नये. पण ज्या वेळेस विधानसभेचा एखादा प्रतिनिधी निवडून जातो तो पुर्ण मतदार संघाचा प्रतिनिधी असतो. तसेच जे पालकमंत्री आहे ते पुर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रऊफ शेख तुम्ही कुणाचाही आवाज दाबू शकत नाही, जे कुणी बोलले ते त्यांच्या मनाप्रमाणे व शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलले. पण बोललेच पाहिजे असं सचिन खेमनर म्हणाले

Leave a Comment