आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा

वृषभ : तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी भरपूर वेळ काढता येईल. आथिर्र्कद़ृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील.

मिथुन : अतिशय गरजेच्या वेळी चपळाईने कृती करण्याच्या क्षमतेमुळे कौतुक होईल. प्रलंबित अडचणी, प्रश्न लवकरात लवकर सोडवा.

कर्क : जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा. नातेवाईकांमुळे वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल; पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती हाताळाल.

सिंह : ऑफिसमध्ये चांगले परिणाम मिळणार नाहीत. तुमची कोणी खास व्यक्ती विश्वासघात करू शकतेे. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहाल.

कन्या : क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जीवावरच काम खेचून नेत आहात, असे चित्र असेल.

तूळ : नातेवाईकांबरोबर हास्यविनोदाने मनावरील दडपण हलके होईल. तुम्ही सुदैवी असल्याचे जाणवेल. मन प्रसन्न राहील.

वृश्चिक : कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल.

धनु : या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो.

मकर : तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल.

कुंभ : घरातील सणाचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा.

मीन : कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली, तर खूप फायदेशीर ठरेल. कर्मकांडे अथवा शुभकार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील

Leave a Comment