डोंगरी विकास योजनेत गावांचा समावेश करा – रविंद्र राजदेव

पारनेर(DSNews24) तालुक्यातील कातळवेढा, पिंपळगाव रोठा, कर्जुले हरेश्वर आणि गारगुंडी या गावांचा डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत समावेश करण्यात यावा, अशी मागणी निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी पारनेर तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संभाजी नरसाळे, उद्योजक धनेश ठोकळ, युवा नेते सचिन वाफारे, सत्यम निमसे, प्रल्हाद शिंदे, योगेश्वर आंधळे, चंदू खेमनर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत गावांचा समावेश झाल्यास गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे राजदेव यांनी सांगितले. या योजनेद्वारे गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होण्यासह स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विशेषतः सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांना डोंगरी भागातील उमेदवार म्हणून पाच गुणांचा अतिरिक्त लाभ मिळतो, ज्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढते. यामुळे गावातील तरुणांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. या निवेदनाद्वारे राजदेव यांनी तहसीलदारांना विनंती केली आहे की, या चार गावांचा डोंगरी विकास योजनेत तातडीने समावेश करावा, जेणेकरून गावांचा विकास आणि तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

 

डोंगरी पट्ट्यातील गावे का वगळली ?

डोंगर भागातील पारनेर तालुक्यातील ५४ गावांचा डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत समावेश करण्यात आला परंतु डोंगरी पट्ट्यातीलच काताळवेढा, पिंपळगाव रोठा, कर्जुले हर्या आणि गारगुंडी या गावांना वगळण्यात आले आहे. डोंगरी पट्ट्यातीलच गावे का वगळली असा प्रश्न उपस्थित करत या संदर्भातच रवींद्र राजदेव यांनी तहसीलदारांना निवेदन दिले व डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत या गावांचा समावेश करण्याची मागणी केली.

1 thought on “डोंगरी विकास योजनेत गावांचा समावेश करा – रविंद्र राजदेव”

Leave a Reply to Sampat pandhare Cancel reply