साकूरच्या बिरोबारायाचरणी निलम खताळ नतमस्तक, यात्रेप्रसंगी दिलीय भेट

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्रातील भक्तगणांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जागृत बिरोबारायाची यात्रा दरवर्षी श्रावण महिनाभर मोठ्या उत्साहात होत असते. या यात्रेला प्रारंभ नागपंचमीपासून झाला आहे. या यात्रेनिमित्त संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी भेट देत श्री बिरोबारायाच दर्शन घेतलं आहे. यावेळी बिरोबाराया चरणी निलम खताळ यांनी नतमस्तक झाल्याच बघायला मिळाले. तसेच त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच काही भाविकांशी चर्चा करत विचारपूस केली. यावेळी रक्तदान शिबीराला निलम खताळ यांनी भेट दिली.

यावेळी साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आ. अमोल खताळ यांना यश येऊदे अशी प्रार्थना निलम खताळ यांनी बिरोबा चरणी केली.

यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, प्रियंका जाधव, गुलाब भोसले, अमृता कोळपकर, सुभाष भुजबळ, सुभाष पेंडभाजे, मच्छिंद्र खेमनर उपस्थित होते.

दरम्यान नागपंचमीच्या दिवशी सकाळपासूनच लाखो भाविक बिरोबारायाच्या दर्शनासाठी आल्याचे बघायला मिळाले. भाविकांच्या दर्शनासाठी खास दर्शनबारीची सोय करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांनी रांगेत दर्शन घेतले. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात पाळणे, खेळणी, मिठाईसह विविध प्रकारचे दुकाने थाटल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात बिरोबाच्या नावाने चांगभलं या जयघोषाने परिसर अक्षरशः भक्तीमय वातावरणात फुलून गेलेला आहे.

यात्रेसाठी राज्यभरासह परराज्यातून तसेच अहिल्यानगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाण्यासह विविध ठिकाणांहून भाविकांनी यात्रेच्या ठिकाणी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने सर्व  सुविधा देखील उपलब्ध केल्या होत्या. यावेळी भाविकांना प्रसादाचे देखील वाटप करण्यात आले. लाखो भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर अक्षरशः गजबजून गेला होता. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून १०० ते १५० स्वयंसेवकांनी सेवा केली. यावेळी प्रत्येक भाविकांचे सुलभ दर्शन व्यवस्थित होण्यासाठी स्वयंसेवक मोलाचं सहकार्य करत होते.

जवळपास संपूर्ण श्रावण महिनाभर बिरोबारायाचा यात्रोत्सव सुरू असणार आहे. लाखो भाविक बिरोबारायाचरणी नतमस्तक होतात. विशेषतः नारळी पौर्णिमेच्या दिवशी भाविक गंगेचे पाणी कावडीने पायी आणत बिरोबारायाला गंगास्नान घालतात. तसेच यात्राकाळात वाण, ओव्यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील होतात. मात्र साकूर परिसरात बिरोबा यात्रेच्या निमित्ताने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment