BREAKING! महापालिका निवडणुका “या” महिन्यात होणार, वाचा निवडणूकींचा संभाव्य कार्यक्रम

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारने प्रारूप प्रभाग रचना अंतिम करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. यामुळे महापालिका निवडणुकीचा लवकरच पडघम वाजणार आहेत.

डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मतदान होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे जानेवारी 2026 मध्ये राज्यातील अनेक महापालिकांना त्यांचे नवे महापौर आणि नगरसेवक मिळू शकतात.

प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया

राज्य सरकारने तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना 23 ते 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाईल. त्यानंतर सुमारे 15 दिवस नागरिकांना आणि संबंधितांना प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदवण्याची संधी मिळेल. या हरकतींवर निवडणूक आयोग सुनावणी घेईल आणि त्यानंतर 10 दिवसांत अंतिम प्रभाग रचना जाहीर करेल. यासोबतच प्रभागांमधील आरक्षणाची सोडतही काढली जाईल. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

महापालिका निवडणुकींचा संभाव्य कार्यक्रम

– 23-25 ऑगस्ट 2025: प्रारूप प्रभाग रचना जाहीर.

– ऑगस्ट-सप्टेंबर 2025: हरकती आणि सूचनांसाठी 15 दिवसांचा कालावधी.

– सप्टेंबर 2025: हरकतींवर सुनावणी आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर.

– ऑक्टोबर 2025: प्रभागांमधील आरक्षणाची सोडत.

– डिसेंबर 2025-जानेवारी 2026: मतदान आणि निकाल.

– जानेवारी 2026: नवे महापौर पदग्रहण करतील.

Leave a Comment