रऊफ शेख यांना मोठं यश, साकूरमधील २५ वर्षांचा प्रलंबित ‘तो’ प्रश्न महिनाभरात सोडवला

संगमनेर(DSNews24/किरण पुरी ) तालुक्यातील साकूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु माध्यमाची प्राथमिक शाळेचे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु आहे. मात्र आठवी नंतर पुढील माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत होती. तसेच विद्यार्थी शाळाबाह्य होऊन विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढत असल्याने विद्यमान भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी या प्रश्नांसाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांची भेट घेऊन इयत्ता नववी व दहावीचे वर्गवाढ करण्याची मागणी केली होती.

या प्रश्नांची तातडीने दखल ना. विखे आणि आ. खताळ यांनी घेत जवळपास २५ वर्षांपासून असलेला प्रलंबित प्रश्नच कायमचा सोडवून टाकला आहे. तसेच जिल्हा परिषदेने इयत्ता नववी व दहावीचे वर्गवाढ करण्यास मान्यता दिली असल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्नच भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांच्या माध्यमातून सुटला आहे.‌

दरम्यान भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ. अमोल खताळ यांच्या शिफारशीसह लेखी निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना दि.16 जुलै 2025 रोजी सादर केले होते. या निवेदनान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ अंतर्गत साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेला इयत्ता आठवीला जोडुन इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरु करण्याची श्री. शेख यांनी केली होती. अखेर जिल्हा परिषदेने इयत्ता नववी व दहावीचे वर्गवाढ करण्यास मान्यता देत तसा अधिकृत आदेश जारी केला आहे.

साकूर पठारभागातील मुस्लिम समाजाची मागील सुमारे 25 वर्षांपासुनची प्रलंबित मागणी या निर्णयामुळे पुर्ण झाली असुन रऊफ शेख यांच्यासह समस्त मुस्लिम समाज बांधव व पालकांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व यांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच या निर्णयाचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी जल्लोषात स्वागत केले आहे.

साकूर येथील उर्दु माध्यमाच्या इयत्ता नववी व दहावीच्या वर्गासाठी स्थानिक संस्था संचलित मान्यतेचा प्रश्न गेल्या 25 वर्षांपासुन प्रलंबित असल्याने यावर तोडगा म्हणुन जिल्हा परिषदकडे ई.9/10 वी चे वर्ग सुरु करण्याची विनंती केली व अवघ्या महिनाभरातच ही मागणी मान्य झाल्याने आमदार अमोल खताळ पाटील व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जि.प.प्रशासनाचे मनपुर्वक आभार मानतो

– रऊफ शेख, जिल्हाध्यक्ष, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा

Leave a Comment