Live – संगमनेर तापले, आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, कुठे निषेध मोर्चा तर कुठे रास्ता रोको 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरूवारी सायंकाळी एका तरूणाने हल्ला केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. मालपाणी लॉन्स येथे ही घटना घडली. आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे हल्लेखोर युवकाचे नाव असून तो खांडगावचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाने हात मिळवण्याच्या बहाण्याने अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. मात्र या तरुणाने हल्ला का केला? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

मात्र या हल्ल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात शकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

तसेच दूसरीकडे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील तळेगाव गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नांदूर शिंगोटे ते लोणी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला.

यावेळी गणेश दिघे व तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे, शिवाजी दिघे, दत्तात्रय दिघे, उत्तम दिघे, डॉ संतोष डांगे, विनय कांदळकर, डॉ. आर पी दिघे, सुनील दिघे मेजर, रामदास दिघे, अमोल दिघे, अशोक जगताप यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी तळेगाव दिघे येथील महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment