मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कामे धाडसाने पार पाडाल.
वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.
कुंभ : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
