कर्जमाफीची वाट न पाहता थकबाकीदारांनी कर्ज परतफेड करा – इंद्रजित खेमनर

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सरकार कर्जमाफीच नुसतं आश्वासन देत पण कर्जमाफी करत नाही. कारण महाविकास आघाडीनेच कर्जमाफी केली होती. त्यामुळे थकबाकीदारांनी कर्जमाफीची वाट न पाहता वेळेत कर्ज परतफेड करा असे आवाहन साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर यांनी केलं आहे.

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सोसायटी, मुळाखोरे पतसंस्था, गजानन महाराज सहकारी पाणीपुरवठा संस्था, विरभद्र पाणी वापर सहकारी संस्था, विरभद्र शेतकी साधन संस्था, विरभद्र देवस्थान ट्रस्ट, विरभद्र मुळाखोरे दूधसंस्थांच्या आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

साकूर येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पा. खेमनर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्या.

यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल मैड, सरपंच सचिन सोनवणे, भाऊसाहेब सागर, महादु कुदनर, लहानु खेमनर, नामदेव खेमनर, कैलास गाडेकर, दादाभाऊ लोंढे, विजय फिरोदिया, कोंडाजी कुदनर, इब्राहिम चौगुले, मारूती केदार, अनमोल खेमनर, विठ्ठल भागवत आदि मान्यवर उपस्थित होते.

इंद्रजित खेमनर बोलताना पुढे म्हणाले की, साकूर सोसायटीचे २ हजार ५८४ सभासद आहे. सोसायटीने ११ कोटी २६ लाख १७ हजार ७६ रूपये कर्ज वाटप केले आहे. कर्जवाटपात संगमनेर तालुक्यात एक नंबरला साकूर सोसायटी आहे. वसुलीत कायमच ९० ते ९५ टक्के होत आहे. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले. तसेच मुळाखोरे पतसंस्थेनेही ६५ कोटी ठेवींचा टप्पा केला आहे. अतिशय अचूक कारभार या पतसंस्थेचा चालू आहे. तसेच विरभद्र मुळाखोरे दूधसंस्थेला अ वर्ग मिळाला असून या संस्थेत १ कोटी १५ लाख रूपयांची ठेव आहे. विरभद्र देवस्थान ट्रस्टकडे देखील साधारणपणे १४ लाख रुपये शिल्लक आहे. तसेच तसेच सर्वच संस्थेचा कारभार चोखपणे पार पाडत आहेत. कारण संस्थाचे सचिव, कर्मचारी अत्यंत अचूकपणे काम करत आहेत. तसेच कुठलीही संस्था अडचणीत नाही. तसेच कुठलाही वायफट खर्च केला जात नाही. चांगल्या नेतृत्वाखाली काम करत असल्याने हे सर्व शक्य होत आहे. कुठलाही भेदभाव न करता संस्था काम करत असल्याचे इंद्रजित खेमनर म्हणाले.

यावेळी साकूर येथील मागील वर्षी पार पडलेल्या माणिक गिरी महाराज सप्ताहाचा जमा खर्च देखील वाचून सांगण्यात आला. सप्ताहात वर्गणीच्या माध्यमातून जवळपास ७३ लाख ८४५ रूपये जमा झाले होते. यामध्ये ४२ लाख ५७८ खर्च झाला असून अंदाजे शिल्लक ३१ लाख रुपये आहे.

यावेळी सर्व संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव, संचालक, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment