संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नुकतीच अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिकेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील भेट दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, शालेय पोषण आहार अधिक्षक रूपेश भालेराव, संगमनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड उपस्थित होते.
दरम्यान यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना शंकरराव खेमनर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी काय काय सुविधांची कामे केली याविषयी संपूर्ण माहिती दिली.
यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिल्याने शिक्षकांच कौतुक करत अशीच उत्कृष्ट गुणवत्ता ठेवा असल्याचं शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी शिक्षकांना सांगितले.
त्यानंतर शाळेचा परिसरासह इमारतीची पाहणी करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुसज्ज परिसर असल्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे, पटसंख्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता गृह, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांचे आधार लिंक चा आढावा शिक्षणाधिकारी यांनी घेतला.
या पाहणीवेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सव्वाशे वर्षांपूर्वीचे जीर्ण झालेले विद्यार्थी नोंद रजिस्टर अक्षरशः लॅमिनेशन करून जतन करण्यात आल्याच शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना दाखविण्यात आले. यावेळी हे रजिस्टर बघून भास्कर पाटील अक्षरशः आश्चर्यचकित झाल्याच बघायला मिळाले. कारण पहिल्यांदाच त्यांनी ही गोष्ट बघितल्याच देखील कबुल केले. तसेच ग्रामपंचायतीसह शाळेचं मोठं कौतुक यावेळी त्यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापिका शायदा शेख, संतोष जाधव, संजय शेंडगे, दिनकर सागर, विकास मिसाळ, दिपा कोंढार, किशोरी खोमणे, हैदर पटेल उपस्थित होते.
