अखेर जयराम ढेरंगे यांनी धनगर समाजाची मागितली जाहीर माफी…..

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागात कॉंग्रेसचे नेते जयराम ढेरंगे यांनी एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीने एकच खळबळ उडाली होती. मात्र या मुलाखतीत जयराम ढेरंगे यांच्याकडून बोलताना धनगर समाजाबद्दल अपवादात्मक शब्द गेले होते. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.

मात्र जयराम ढेरंगे यांनी धनगर समाजाबद्दल अपवादात्मक शब्द बोलल्याने धनगर समाज चांगलाच आक्रमक झाल्याच बघायला मिळाले. यानंतर आता जयराम ढेरंगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत धनगर समाजाची दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

जयराम ढेरंगे यांची पोस्ट जशीच्या तशी

दोन दिवसापूर्वी मी एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये बोलण्याच्या ओघातून चुकून धनगर समाजाबाबत माझ्याकडून शब्द गेला . त्याबाबत धनगर समाजातील काही मित्रांचे फोन मला आले तेव्हा समाजातील कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.

Leave a Comment